Ticker

6/recent/ticker-posts

राजाभैया पवार मित्रमंडळाची दानशुरता : गोरगरीब नागरीकांना धान्यरुपाने मदतीचा हात


राजाभैया पवार मित्रमंडळाची दानशुरता : गोरगरीब नागरीकांना धान्यरुपाने मदतीचा हात
वाशिम, 30 मार्च - संचारबंदीच्या पार्श्‍वभूमिवर शहरात गोरगरीब व हातमजुरी करणार्‍या नागरीकांवर उपासमारीची वेळ येऊ नये या उदात्त हेतूने अनेक दानशुर समाजसेवक मदतीसाठी पुढे येत आहेत. येथील समाजसेवक राजाभैया पवार आणि मित्रमंडळ गोरगरीबांच्या मदतीला धावले असून मित्रमंडळाच्या सहकार्यातून 30 मार्च रोजी माहुरवेश परिसरातील गोरगरीब नागरीकांना धान्य वितरणाचा समाजाभिमुख उपक्रम राबवून आदर्श ठेवला आहे.
 आजघडीला कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या आजाराला रोखण्यासाठी देशभर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे रोजमजुरी करणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वत्र काम बंद असल्यामुळे हातावर कमवून खाणार्‍यांची मोठी पंचाईत झाली आहे. घरात अन्न नाही, बाहेर काम नाही. 
 अशा बिकट परिस्थितीत गोरगरीब लोकांना फुल नाही तर फुलाची पाकळी स्वरुपात मदत व्हावी या उद्देशाने समाजसेवक राजाभैय्या पवार यांनी पुढाकार घेत गहू व तांदूळ धान्याचे पाकीट बनवून स्थानिक माहुरवेश भागातील गोरगरीब नागरिकांना 120 धान्य किटचे वितरण 30 मार्च रोजी केले. याप्रसंगी त्यांनी व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी घरोघरी कोरोना संदर्भात लोकांना जागरूक राहुन वारंवार हात धुण्याचे, मास्क वापरण्याचे, स्वछता ठेवण्याचे व घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. या समाजसेवी उपक्रमामध्ये नगरसेवक उमेश मोहळे, सामाजिक कार्यकर्ते सुशील भिमजियाणी, शैलेश खडसे, भगत खडसे, श्रावण खडसे, दीपक साठे, तुषार खडसे, अविनाश तुपसौंदर, महादेव कांबळे, सागर लोखंडे, देवेश पवार, ईश्वर तांबेकर, संतोष, भारत जाधव, विक्रम बबेरवाल, विशाल कलोसे आदींनी अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.