Ticker

6/recent/ticker-posts

लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून... एकत्र येऊन घंटानाद करणं अपेक्षित नाही- अजित पवार

लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून... एकत्र येऊन घंटानाद करणं अपेक्षित नाही- अजित पवार
कोरोनाविरोधात लढणाऱ्या यंत्रणांचे व घरातून घंटानाद, थाळीनाद करणार्‍या जनतेचे मानले आभार...
मुंबई दि. २२ मार्च- कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार! जनतेनं आपल्या घरातून घंटानाद,थाळीनाद केले त्याबद्दल त्यांचेही आभार परंतु लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून... एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही अशा शब्दात आपली नाराजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणं टाळण्याची गरज आहे असे सांगतानाच कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं असं आवाहन अजित पवार यांनी सोशल मीडियावर केले आहे.