गर्दी टाळण्यासाठी व्यापारी संघटनांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
वाशिम, दि. २१ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध व्यापारी आस्थापनांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थपाना वगळता इतर अस्थापना बंद ठेवून व्यापारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २१ मार्च रोजी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मोडक बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अविनाश आहेर, वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांच्यासह व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, अन्नधान्य, भाजीपाला, दुध, किराणा दुकाने, औषधे तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवावीत. याव्यतिरिक्त अन्य दुकाने बंद ठेवाव्यात. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये सुद्धा ग्राहकांची गर्दी होवू नये, यासाठी संबंधित आस्थपाना मालकांनी खबरदारी घ्यावी. तसेच व्यावसायिकांनी ग्राहकांना घरपोच सेवा देण्याबाबत प्रयत्न करावेत. मास्क व सॅनिटायझरची विक्री निश्चित केलेल्या दरानेच करावी. कोणीही या वस्तूंचा साठा करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसाठी संबंधित पेट्रोल पंप मालकांनी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत. तसेच त्यांना योग्य काळजी घेण्याच्या सूचना कराव्यात, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे, हे आपल्यासमोरील आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापारी बांधवांनी स्वतःहून आपल्या आस्थापना बंद ठेवून सार्वजनिक आरोग्य कायम राखण्यासाठी सहकार्य करावे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ