जगभरात 'इतकी' नववर्ष संवत्सरे; उद्या चैत्रारंभ!
हिंदू नववर्ष म्हणजेच चैत्र महिन्याचा आरंभ उद्यापासून होत आहे. मंगळवार, २४ मार्च रोजी दुपारी अमावास्या समाप्ती होत असून, चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होत आहे. मात्र, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे बुधवार, २५ मार्च रोजी गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. हिंदू संस्कृतीनुसार, गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार हिंदू नववर्षारंभ करण्याची परंपरा आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. इंग्रजी कालनिर्णयानुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरू होत असले, तरी जगभरात विविध दिवशी नववर्षे साजरी केली जातात. जाणून घेऊया जगभरातील विविध नववर्षे आणि तिथी...
१ जानेवारी हा सर्वसाधारण वर्षारंभाचा पहिला दिवस मानला जातो. मात्र, जगातील विविध देश व धर्म यांचा हिशोब केल्यास ३६५ दिवसांमध्ये प्रत्यक्षात ८० नववर्षारंभ दिन येतात. पैकी कित्येक दिनांक सारखे असले, तरी वर्षभरातील एकूण १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की, त्या दिवशी नवीन वर्षारंभ होत असतो. त्याचप्रमाणे ही नववर्षे विविध संवत्सरनामांनी सुरू होतात.
इसवी सनाचे संवत्सर (ग्रेगोरियन कॅलेंडर) ख्रिश्चन धर्मगुरू पोप ग्रेगरी यांनी १५८२ साली तयार केले. ज्युलियस सीझरने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा केल्या. रोमन केलेंडरमधील १० महिन्यांमध्ये ज्युलियस सीझरने जुलैची आणि ऑगस्टसने ऑगस्ट महिन्याची भर घातली. त्यामुळे ते कॅलेंडर १२ महिन्यांचे झाले. ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे अनुयायी अजूनही रोमन कॅलेंडरच मानतात. त्यांचे नववर्ष १४ जानेवारीला सुरू होते.
चीनचा नववर्षारंभ २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होतो. दर तीन वर्षांनी चांद्र कॅलेंडरचा सौर पंचांगाशी मेळ घालावा लागतो. चीनच्या वर्षांची आणि राशींची नावे बारा जनावरांच्या नावांवरून ठेवण्यात आली आहेत. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी खूप फटाके फोडतात. चीनने सन १९४९ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला.
सन १८७३ पासून जपानींनी ग्रेगोरियन कॅलेडरनुसार वर्षारंभाचा दिवस मानू लागले. या दिवशी कुटुंबातील लोकांचे कष्ट कमी व्हावेत, यासाठी बौद्ध प्रार्थनागृहांत जाऊन १०८ वेळा घंटा वाजवतात. नव्या वर्षाला जपानमध्ये ओमिसाका म्हणतात. कंबोडियाचा वर्षारंभ १३ किंवा १४ एप्रिलाला होतो. या दिवशी कंबोडियाची जनता विभिन्न धार्मिक स्थळांमध्ये जाते आणि पारंपरिक खेळ खेळते.
कोरियन वर्षाची सुरुवात चांद्र पंचांगाप्रमाणे होत असली, तरी १ जानेवारी हाही वर्षारंभाचा दिवस समजला जातो. थायलंडचे नववर्ष १३ किंवा १४ एप्रिलला होते. या दिवशी लोक एकमेकांना थंडगार पाण्याने भिजवून शुभेच्छा देतात.
चिनी कॅलेंडरप्रमाणे व्हिएतनाममध्ये नवीन वर्ष २० जानेवारी ते २० फेब्रुवारी यादरम्यान सुरू होते. श्रीलंकेच्या नववर्षाच्या पहिल्या दिवसाला 'अलुत अवरुद्ध' म्हणतात. हा दिवस एप्रिलच्या मध्यावर येतो. नव्या वर्षाच्या आरंभीच्या दिवशी श्रीलंकेचे प्रजाजन नैसर्गिक वस्तू वापरून स्नान करतात.
रशिया आणि जॉर्जिया येथील लाखो लोकं ज्युलियन कॅलेंडर पाळतात. त्यांचे नववर्ष १४ जानेवारीला सुरू होते. इथियोपियात नववर्षाला 'एनकुतातश' म्हणतात. या वर्षाचा पहिला दिवस ११ सप्टेंबर रोजी येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात हा दिवस एक दिवस पुढे जातो.
अमेरिकेच्या पेनसिल्व्हानियामध्ये 'ओडुंडे' नावाचा एक उत्सव असतो. ज्या दिवशी हा उत्सव असतो, त्या दिवसाला 'आफ्रिकन न्यू ईयर' म्हणतात. हा दिवस जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येतो. नेपाळ परंपरेनुसार त्यांचे नवीन वर्ष १४ एप्रिलला सुरू होते. या दिवशी पारंपरिक पोषाख परिधान करून हा दिवस साजरा केला जातो.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ