नागरीकांनी 31 मार्च पर्यत पाणीपुरी तथा उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे - मुख्याधिकारी दिपक मोरे
कोरोना वायरसच्या प्रतिबंधासाठी नगर परिषद वाशीमच्या विविध उपाययोजना
बसस्थानक, रेल्वेस्टेशन व खाजगी बसस्थानकाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी विशेष व्यवस्था
वाशीम, 20 मार्च - कोरोना वायरसच्या प्रतिबंधासाठी शहरातील नागरीकांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी 18 मार्च अध्यक्षांच्या दालनात शहरातील सर्व खाजगी बस मालक , चालक तसेच वाशिम रेल्वे स्टेशन मास्तर उजवे, बसस्थानक प्रमुख तेलगोटे यांच्यासोबत नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकुर, मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये नगराध्यक्ष हेडा यांनी वाशिम शहरातील सर्व खाजगी बस मालक , चालक तसेच वाशिम रेल्वे स्टेशन मास्तर उजवे व वाशिम बसस्थानक प्रमुख तेलगोटे यांना निर्देश दिलेत की, शहरामध्ये रेल्वेने, बसने व खाजगी बसने बाहेरुन येणार्या व्यक्तींनी त्याचे हात स्वच्छ धूवूनच शहरामध्ये प्रवेश करावा यासाठी रेल्वेस्टेश, बसस्थानक व खाजगी बस थांबे येथे हात स्वच्छ धुण्याकरीता हॅण्डवॉश व पाणी उपलब्ध करून देणेत येईल. जेणेकरून कोरोना वायरसचा प्रसार शहरामध्ये होणार नाही. तसेच शहरातील सर्व पाणीपुरी हॉटेल चालक यांनी सुध्दा आपले हात स्वच्छ धूवून त्यांच्याकडे येणार्या नागरिकांना अन्न दयावे. त्यामुळे सुध्दा कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यास मदत होईल. तसेच शहरातील नागरिकांनी 31 मार्च पर्यंत पाणीपुरी किंवा उघडयावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे व नगरपरिषद तसेच जिल्हा प्रशासनास कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यास मदत करावी.
तसेच नगरअध्यक्ष यांनी शहरातील सर्व पालकांना आवाहन केले आहे की, त्यांचे पाल्य बाहेरगावावरून वाशिम शहरात आल्यानंतर त्यांना कोरोना वायरसचे लक्षण आढळल्यास त्यांना तात्काळ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करावे किंवा शासनाने जनहितार्थ प्रसिध्द केलेल्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना वायरसचा लक्षण असणारी व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती सुध्दा प्रशासनाला देवून देशामध्ये आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मदत करावी.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ