Ticker

6/recent/ticker-posts

सीएम फंडात 11 हजार : 1 हजार मास्कचे वितरण : डॉ. माधव हिवाळे यांची सामाजीक बांधीलकी


सीएम फंडात 11 हजार : 1 हजार मास्कचे वितरण
डॉ. माधव हिवाळे यांची सामाजीक बांधीलकी
करोना पिडीतांच्या उपचारासाठी मदत
अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सहभाग
वाशीम - महाराष्ट्रातील करोना पिडीतांच्या उपचारासाठी सामाजीक बांधीलकीचे भान ठेवुन अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 हजार रुपयाचे योगदान दिले आहे. 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना डॉ. माधव हिवाळे यांच्या हस्ते 11 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती सहाय्यक तानाजी घोलप, पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर शिंदे, टीव्ही 9 चे जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल देशमुख, सामटीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी गजानन भोयर, एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी मनोज जयस्वाल, एएमचे जिल्हा प्रतिनिधी पंकज गाडेकर, साजन धाबे, दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर वैद्य, संदीप पिंपळकर, वैभव वैद्य, पवन लाखे आदींची उपस्थिती होती. जिल्हयातील संचारबंदीची नियमावली पाळून यावेळी डॉ. माधव हिवाळे व नंदकिशोर शिंदे या दोघांनीच जिल्हाधिकारी यांच्या कक्षात प्रवेश करुन श्री हिंगे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपुर्द केला.
 यासोबतच डॉ. हिवाळे यांनी जिल्हयातील नागरीकांना करोना विषाणूच्या बचावासाठी एक हजार मास्कचे जिल्ह्यात वितरण करुन इतरांपुर्ण आदर्श ठेवला आहे.
 चिनच्या वुहान शहरापासून उमग पावलेल्या करोना विषाणुमुळे संपुर्ण जग सध्या लॉकडाऊन झाले आहे. करोना विषाणूचा संपुर्ण संपुर्ण भारतातही झाला असून या विषाणूची सायकल तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 14 एप्रिलपर्यत संचारबंदी घोषीत केली आहे. या संचारबंदी दरम्यान दररोज नव्याने आढळत असलेल्या करोनापिडीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकिय कर्मचारी, आशा सेविका आदी घटक आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत. तर संचारबंदीचे पालन होण्यासाठी पोलीस बांधव ऊन, पाऊस, थंडी, वारा आदींची तमा न बाळगता अहोरात्र आपले कर्तव्य इमानेइतबारे पार पाडीत आहेत. अशा परिस्थितीत आपलेही समाजाप्रती, देशाप्रती उत्तरदायित्व ओळखून अनेक सामाजीक संस्था, समाजसेवक मदतीसाठी पुढे येत आहेत. हे सामाजीक भान ओळखून अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी करोना पिडीतांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत 11 हजार रुपयाची मदत देवून इतरांपुढे सामाजीक कृतज्ञतेचा आदर्श निर्माण केला आहे. यासोबतच डॉ. हिवाळे यांनी जिल्हयातील नागरीकांमध्ये करोना विषाणूच्या बचावासाठी एक हजार मास्कचे जिल्ह्यात वितरण करुन इतरांपुर्ण आदर्श ठेवला आहे. त्यांचा हा आदर्श घेवून समाजातील इतरही घटक पुढे येतील हे निश्‍चित.