
वाशिम - शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनंाची लोककला व पथनाट्याव्दारे जाहिरात व प्रसिध्दी करणार्या लोककला व पथनाट्य पथक संस्थांच्या यादीस शासनाची मान्यता मिळाली असून या यादीत वाशीम जिल्हयातील ९ बहूउद्देशिय संस्थांचा समावेश आहे. यासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १४ ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
कार्यक्रम सादर करणार्या एका पथकाला प्रती कार्यक्रम ५ हजार रुपये मानधन पथक प्रमुखाच्या नावे किंवा ईसीएस व्दारे संस्थेला देण्यात येईल. लोककला व पथनाट्याकरीता संहिता लेखनाकरीता २ हजार रुपये मानधन देण्यात येईल. लोककला व पथनाट्य पथकांना तालीमीकरीता १० हजार रुपये शुल्क अदा करण्यात येईल. यामध्ये प्रवासखर्च, अल्पोपहार, भोजन, जागेचे भाडे यांचा समावेश असून हे शुल्क फक्त एका वेळेसाठी देण्यात येईल.
मान्यता मिळालेल्या यादीमध्ये रामचंद्र बहूउद्देशिय संस्था सावंगा जहां. जि. वाशीम (मधुकर गायकवाड), म. ज्योतीबा फुले बहूउद्देशिय संस्था उमरा शम. जि. वाशीम (संतोष खडसे), भरारी बहूउद्देशिय संस्था पिंप्री खु. जि. वाशीम (सौ. विद्या भगत), लोकसेवा सांस्कृतीक मंडळ गोहोगाव हाडे जि. वाशीम (रतन हाडे), समाज जागृती बहूउद्देशिय संस्था, समतानगर, वाशिम (उत्तम इंगोले), सुर्यलक्ष्मी बहूउद्देशिय संस्था, वाशीम (विलास भालेराव), मानव बहूउद्देशिय संस्था, नालंदानगर, वाशीम (मोहन भगत), साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहूउद्देशिय संस्था जांभरुण महाली जि. वाशिम (माणिक बांगर) व नटश्री बहूउद्देशिय संस्था, मानोरा जि. वाशिम (यशवंत पद्मगिरवार) या संस्थांचा समावेश झाला आहे.