Ticker

6/recent/ticker-posts

कुंभी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम अंतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन


कुंभी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम अंतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन
बियाण्याची चांगली उगवण व पिकाच्या उत्पादन वाढीसाठी बिबीएफ तंत्राचा अवलंब करावा
उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी यांचे आवाहन
वाशीम - महाराष्ट्र शासन कृषि विभाग व जागतिक बँक अर्थसहाय्य अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम कुंभी येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त राज्यात दरवर्षी 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी कृषीमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन 1 ते 7 जुलै दरम्यान करण्यात आले. त्या अनुषंगाने कुंभी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम कोरोना संसर्ग संबंधित सर्व नियम पाळून घेण्यात आला.



    कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, केविके कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे, पं.स. सदस्य अनंतकुमार शेळके, सरपंच विद्याताई कावरे, पोलीस पाटील देवीदास चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान खोटे, उपसरपंच दुर्गाताई चौधरी, शेतीशाळा प्रशिक्षक श्रीनाथ देशमुख, समूह सहाय्यक बुद्धरत्न उंदरे, पोक्रा समिती सदस्य पांडुरंग बाविस्कर, शालीग्राम मनवर, रामराव चौधरी, साळंकाबाई इळे, मंदाबाई इळे, होस्ट फोर्मर रामराव कावरे, नामदेव खोटे, केशव चौधरी, देवेंद्र शेळके, उमेश मंत्री, कृषीताई गीताबाई बाविस्कर, पशुसखी शारदा चौधरी, महिला बचतगट अध्यक्ष सीमा कावरे, ज्योती शेळके, भास्कर इळे, दत्ता बांगर, दत्ता नागुलकर, ज्ञानेश्वर इळे, सुभाष बरडे, दत्ता बरडे, अश्विन शिनगारे, आनंदा मनवर, दिलीप व्यवहारे इत्यादी उपस्थित होते.



    यावेळी पोकरा अतंर्गत बीबीएफ तंत्रज्ञानाने सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आलेल्या पिकाची पाहणी व शेतीशाळा वर्ग घेऊन बी.बी.एफ. तंत्र व एकात्मिक किड व्यवस्थानाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम कृषी संजीवनी समितीची सभा घेण्यात येऊन उपस्थितांना कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे नियोजन, गावाचा पाण्याचा ताळेबंद  करणे, जलसंधारण कामे महत्व व नियोजन, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, पावसाचा खंड, विहीर पुनर्भरण, औजारे बँक, यांत्रिकीकरण, इ. विषयी सविस्तर माहिती देऊन चर्चा करण्यात आली.
    तसेच महिला शेतकरी गटासोबत संवाद साधून लघु उद्योग, बिजप्रक्रीया करणे, पिकात पक्षीथांबे उभारणे, निंबोळी अर्क तयार करणे, मुलस्थानी जलसंधारण, किड रोग नियंत्रणविषयी चर्चा करण्यात आली. व वैयक्तीक लाभाच्या कामाची पाहणी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचालन कृषी सहाय्यक डी. एम. पाईकराव यांनी केले तर सुभाष कावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.