Ticker

6/recent/ticker-posts

कृषि विस्तार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट सेवाकार्यामुळे कास्तकारांच्या सोयाबीन उत्पादनात वाढ : बिबीएफ तंत्रासाठी प्रोत्साहन : कृषि सहाय्यक नितीन उलेमाले यांचा कृषीदिनी सत्कार


वाशीम - कोरोना महामारीमध्ये लागु झालेल्या टाळेबंदीमध्ये सोयाबीन उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन, पेरणीसाठी ट्रॅक्टरची योग्य हाताळणी, बियाणे उगवण शक्ती तपासणी, बिज प्रक्रीया मोहीम, शेतकर्‍यांना बांधावर मार्गदर्शन आदी महत्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसोबतच शेतकर्‍यांना बिबीएफ तंत्रज्ञानासाठी प्रोत्साहन या कृषि विस्तार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सेवाकार्याबद्दल कृषि सहाय्यक नितीन उलेमाले यांचा १ जुलै रोजी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने कृषीदिनाचे औचित्य साधुन विशेष सत्कार करण्यात आला. जि.प. सभागृहात पार पडलेल्या या सत्कार कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषि अधिक्षक तोटावार, जि.प. उपाध्यक्ष शाम गाभणे आदींच्या हस्ते उलेमाले यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त प्राचार्य स्व. दत्तात्रय उलेमाले व सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती लता उलेमाले यांचे सुपुत्र तथा माजी कुलगुरु स्व.डॉ. हिरोजी उलेमाले यंाचे पुतणे नितीन उलेमाले तालुका कृषि अधिकारी कार्यालयाअंतर्गत मौजे घोटा, सोंडा व शेलु खुर्द येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यांनी कृषि विस्तार कार्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. सध्या कोरोना महामारीमुळे संपुर्ण जगच त्रस्त आहे. या महामारीमध्ये शेतकरी सुध्दा गोवल्या गेला आहे. परंतु कृषि विस्तार कार्याचे ध्येय घेवून कृषि क्षेत्रात कार्य करतांना नितीन उलेमाले यांनी सामाजीक तसेच शासकीय जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे बजावली आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी असण्याची मुख्य कारणे हेरुन कृषि विभागाने यावर्षी पेरणी तसेच खते देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टरचा कसा दुरुपयोग होतो व त्यामुळे कशा रितीने उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो यासाठी महत्वाकांक्षी मोहीम राबविली. याअंतर्गत ट्रॅक्टर चालकांना योग्य प्रशिक्षण देण्यासठी उलेमाले यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजीत करुन शेतकर्‍यांना याचा थेट लाभ दिला. घरचे सोयाबीन बियाणे असो किंवा बियाणे उगवण शक्ती तपासणी, बिज प्रक्रीया मोहीम असो त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील गावांमध्ये थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहवुन तेथे मोलाचे मार्गदर्शन केले. यासोबतच सोयाबीन पिकांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने बिबिएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहीत केले.
  विशेषत: लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला बियाणे, फळपिके तसेच हळदीचे बेणे मरााठवाड्यातुन आणण्यासाठी शेतकर्‍यांना सर्वोतोपरी मदत केली. या विपरीत परिस्थितीत बाहेर राज्यात, जिल्हयात अडकुन पडलेले शेतकरी, त्यांच्या पाल्यांना परत आणण्यासाठी ई-पास सुविधेबाबत मार्गदर्शन करुन योग्य ते सहकार्य आपुलकीने उपलब्ध करुन दिले. ही सर्व कामगिरी बजावतांना रस्त्यावर झालेल्या अपघात प्रसंगी पिडीतांना सर्र्वोतोपरी आपातकालीन मदत करुन मानवतेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्याचे प्रसारमाध्यमांसोबत विविध सामाजीक संघटनांनी दखल घेवून त्यांचा सत्कार केला आहे.