Ticker

6/recent/ticker-posts

लॉयन्स क्लब ऑफ वाशिमचा सहावा उद्घाटन आणि पदग्रहण सोहळा उत्साहात : अध्यक्षस्थानी लॉ. सौ. ज्योती चरखा यांनी सुत्रे सांभाळली





वाशिम - कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊनच्या सर्व नियमाचे पालन करत लॉयन्स क्लब ऑफ वाशिमचा ६ वा उद्घाटन समारंभ आणि नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा शपथविधी सोहळा २८ जुन रोजी स्थानिक कोल्हटकरवाडी येथील चिंतामणी निवासस्थानी डिजीटल पध्दतीने यशस्वीरित्या पार पडला. यावेळी झूम अ‍ॅपवर लॉयन्स क्लबचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्षा ज्योती चरखा, सचिव लॉ. हेमा सोमाणी, कोषाध्यक्ष लॉ. सविता अग्रवाल आणि अन्य अधिकार्यांचा शपथविधी पार पडला. माजी प्रांत अध्यक्षा भारतीजी वर्मा, राष्ट्रीय अध्यक्षा लॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रांताध्यक्षा ला. सुनंदा जी गुप्ता, माजी अध्यक्षा लॉ. हरविंदरजी सेठी, जिल्हा मार्गदर्शिका श्वेताजी बडजात्या आणि जिल्हा बुलेटिन संपादीका लॉ. हर्षदा चरखा ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन व दीपप्रजवलनाने करण्यात आली. ध्वजवंदन गीत लॉ. प्रियंका बाकलीवाल यांनी गायले. यावेळी अनुपमा मानधने यांनी स्वागतगित गायले. प्रारंभी गलवान खोर्या चिनी सैनिकांच्या हल्ल्यात विरमरण आलेल्या भारतीय सैनिकांना दोन मिनीटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. व यापुढे कोणत्याही चिनी वस्तु विकत न घेण्याची व त्यावर बहीष्कार टाकण्याची एकमुखाने शपथ घेण्यात आली.
    यानंतर माजी सचिव लॉ.अनिता नेनवाणी यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला. माजी अध्यक्षा सारिका बाकलीवाल यांनी गेल्या वर्षी झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. पाहुण्याची ओळख करून अर्चना डाळे यांनी दिली. यानंतर शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला. ज्यामध्ये अध्यक्षा लॉ. ज्योती चरखा, सचिव लॉ. हेमा सोमाणी, कोषाध्यक्षा लॉ. सविता अग्रवाल, उपाध्यक्ष लॉ. अमरजीत कौर कपूर, लॉ. प्रियंका वोरा, लॉ. अर्चना डाळे, सहसचिव लॉ. ज्योती छपरवाल लॉ. सरिता अग्रवाल, सहकोषाध्यक्ष नयन मुंदडा, लॉ. नम्रता झांझरी, टेमर लॉ. माला वंजानी, लॉ. मीना कंदोई, टेल ट्विस्टर लॉ. जया परमा, लॉ. पुनम लड्डा, पीआरओ  लॉ. मधु गुप्ता, लॉ. अनुपमा मंधने, ग्रिटर समिती लॉ. कविता दगडिया, लॉ. प्रियंका बकालीवाल, मॅक्सिन कमेटी लॉ. प्रेरणा अग्रवाल, लॉ. गीता चरखा, लॉ. सुमन वर्मा, लॉ. अपर्णा शिंदे, लॉ. पायल अग्रवाल, लॉ. नीता वर्मा, संचालक लॉ. संगीता बाहेती, लॉ. स्वेता बडजात्या, लॉ. स्वाती भट्टड, लॉ. हर्षदा चरखा, लॉ. कमला बागडिया, लॉ. संतोष अग्रवाल, लॉ. निलिमा चव्हाण यांना प्रवर्तक सुनंदाजी यांनी पदाची शपथ दिली. आणि हरमिंदरजी सेठी यांनी नवीन सदस्य भारती सोमाधी आणि नीरू नारंग यांना शपथ दिली. जिल्हा उपक्रम चेअर पर्सन लॉ. स्वेताजी बडजात्या यांचेही स्वागत व सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष लॉ.  ज्योती चरखा यांनी अध्यक्षीय भाषण केले.
    या सोहळ्यात गरजू महिलांना किराणा, फेसमास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. गरजू मुलांना रेनकोट आणि नोटबुकचे वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पूनम लढ्ढा यांनी केले. आभार नवनिर्वाचित सचिव लॉ. हेमा सोमानी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.