वाशिम, दि. 08 (जिमाका) : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एक रक्कमी लाभाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याबाबत पाठपुरावा करणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आयोगाचे केंद्र सुरु करण्याबाबत सुध्दा प्रयत्नशील असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज, 8 जुलै रोजी दिली. जिल्हा परिषद सभागृहात महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जिल्हयात व्हाटसअप ग्रुपच्या सहाय्याने सुरु असलेले पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या उपक्रमाचे कौतुक करुन जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारखी कार्यालये एकाच छताखाली येवून त्यायोगे महिलांना योजनेच्या लाभासाठी अधिक सुविधा मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यात पूरक पोषण आहाराचे नियमितपणे घरपोच वितरण करावे. याबाबतीत कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही अॅड. यशोमती ठाकुर यांनी अधिकार्यांना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्राम बाल विकास केंद्र, एकात्मिक बाल विकास योजना, अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा, माझी कन्या भाग्यश्री, वन स्टॉप सेंटर, डिजिटल अंगणवाडी आदी योजनांचा श्रीमती ठाकूर यांनी यावेळी आढावा घेतला.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ