Ticker

6/recent/ticker-posts

दत्तनगर येथे युवा सेना शाखेचे उद्घाटन; विविध ठिकाणी नागरीकांना मास्कचे वितरण


वाशिम - शहरातील अकोला रोड भागातील दत्तनगर येथे ४ जुलै रोजी रोजी युवा सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी तर अध्यक्षस्थानी युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गेे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नागोराव ठेंगडे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहरप्रमुख आकाश कांबळे, न.प. सदस्य अतुल वाटाणे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते युवा सेना शाखा नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा सेनेच्या वतीने शहरातील दत्तनगर प्रभाग, छत्रपती शिवाजी चौक येथील नागरीकांना आणि युवासैनिकांना मास्कचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला युवासेना माजी शहरप्रमुख दिलीप बरेटीया, प्रविण ठेंगडे, वैभव इंगळे, प्रसिध्दीप्रमुख नारायण ठेंगडे, आशिष जाधव, आशु वानखेडे, सागर इंगोले, माधव गोरे, चेतन इंगोले, दत्तनगर शाखाप्रमुख सुर्यकांत जगताप, शाखा उपप्रमुख आकाश तळणकर, शाखा सचिव शाम चव्हाण, सदस्य रोहीत काळे, विजय वानखेडे, गौरव काठोळे, नागेश काळे, अमोल चव्हाण, राहुल वाघमारे, श्याम पवार, गणेश लळकर, सागर सोनुने, संदीप गरड, राहुल भडके, साईराम नरवाडे, बाळु भोयर, सोनु काकडे, बालाजी गोटे, वैभव इंगळे, किरण बांगर, युवराज चव्हाण यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व दत्तनगर भागातील रहिवासी उपस्थित होते.
 कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरेश मापारी, रवि भांदुर्गे, गजानन भांदुर्गे आदींनी कार्यकर्त्यांना समायोचित मार्गदर्शन केले. रवि भांदुर्गे म्हणाले की, गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी ठिकठिकाणी युवा सेनेच्या शाखेचा विस्तार करुन युवकांना संघटीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाखा उभारणीचा संकल्प करावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन गजानन ठेंगडे यांनी तर आभार आकाश कांबळे यांनी केले.