Ticker

6/recent/ticker-posts

शिवसैनिक नामदेवराव हजारे यांची निस्वार्थ सेवा : प्रभागात स्वखर्चाने जंतुनाशक फवारणी


शिवसैनिक नामदेवराव हजारे यांची निस्वार्थ सेवा
प्रभागात स्वखर्चाने जंतुनाशक फवारणी
वाशीम - आपण ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या गावात, ह्या परिसरात राहतो त्या परिसरातील आपल्या बांधवांना कोणताही स्वार्थ न ठेवता सर्वतोपरी मदत करणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सेवाधर्माला उच्च स्थान देण्यात आले आहे. या संस्कृतीनुसार भारतात मृत्युचा फास आवळणार्‍या करोनाची लागण आपल्या परिसरातील बंधुभगिनींना होवू नये या उदात्त भावनेने येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेवून वाटचाल करणारे तरुण मावळे, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख नामदेवराव हजारे यांनी निस्वार्थ भावनेने व स्वखर्चाने आपल्या प्रभागात जंतुनाशक फवारणी करुन करोना आजाराला परिसरापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 
 भारताला करोनापासून दुर ठेवण्यासाठी सरकारने 3 मे पर्यत संपुर्ण लॉकडाऊन घोषीत केले असतांना अशा परिस्थितीत हातावर पोट असणारे अनेक मजुर करोनाचे नव्हे तर लॉकडाऊनचे बळी पडतात काय अशी स्थिती निर्माण झाली असतांना छत्रपतींची व संतांची शिकवण असलेल्या या महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीसाठी अनेक निधड्या छातीचे सच्चे विर धावून जात आहेत. अनेक जण जमेल तसे धनधान्य, कपडेलत्ते, भोजन आदींची मदत गोरगरीबांना करीत आहेत. या मदतीमध्ये पुरुषांसह महिला भगिनीही एक पाऊल पुढे आहेत. अनेकांनी जमेल तशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये भरभरुन मदत केली आहे. लहानथोरांनी आपली पिगी बँक फोडून त्यातील पैसे करोनापिडीतांच्या उपचारासाठी देशाला दिले आहेत. तर अनेक जण आपआपल्या परिसरात स्वखर्चाने जंतुनाशक फवारणी करुन आपल्या सेवाधर्माला जागुन मायभूमिची, आपल्या जनतेची सेवा करीत आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शिवसेनेचे उपशहरप्रमुख व सामाजीक कार्यकर्ते नामदेवराव हजारे यांनी नागरीकांच्या सुरक्षेसाठी आपल्या परिसरात जंतुनाशक  फवारणी केली आहे. यासोबतच आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी शासनाच्या आदेशाचे पालन करुन सर्वानी आपल्या घरातच राहावे सोबतच नागरीकांनी मदत लागल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. ‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ’ या सुविचारानुसार कोणताही जात, धर्म न पाहता एकमेकांना मदत करणार्‍या या सेवाधर्मी युवकांचे कार्य कौतुकास्पद असून इतरांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी अशी आहे.