Ticker

6/recent/ticker-posts

नागा साधूंच्या क्रुर हत्येप्रकरणी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या - भिमसंग्राम संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


नागा साधूंच्या क्रुर हत्येप्रकरणी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या
सीबीआय चौकशीची मागणी : भिमसंग्राम संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वाशिम - महाराष्ट्रातील पालघरच्या डहाणूमध्ये जमावाकडून निरपराध नागा साधूंच्या क्रूर हत्येचा भिमसंग्राम सामाजीक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
 निवेदनात नमूद आहे की, कोरोना महामारी नष्ट होण्यासाठी भारतात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्हयातील डहाणूमध्ये वाहनाने जात असलेल्या दोन निरपराध नागा साधू व सोबत असलेल्या एका व्यक्तीची हिंसक जमावाकडून क्रुर हत्या करण्यात आली. संघटनेच्या वतीने या क्रुर घटनेचा निषेध करण्यात येत आहे. पुरोगामी म्हणविल्या जाणार्‍या महाराष्ट्रात घडलेली ही घटना अतिशय शरमेची आहे. 
 महाराष्ट्रातील पालघरमध्ये जुना आखाडाचे संत स्वामी कल्पवृक्ष गिरी, स्वामी सुशील गिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे एका अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी कांदिवलीहून दाभाडी-खानवेल मार्गावरून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यासाठी त्यांनी एक गाडीही भाड्यानं घेतली होती. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी 120 किलोमीटरचं अंतरही कापलं होतं. परंतु, डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावाजवळ वनविभागाच्या एका संतरीनं त्यांना थांबवलं. थोड्याच वेळात इथं जमाव जमा झाला. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देत, त्यांना दगडाने ठेचून मारले. यावेळी तिथे पोलीसही उपस्थित होते.
 या दोन निरपराध साधु व सोबतच्या व्यक्तीच्या क्रुर हत्येचा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून या हत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करुन गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी संघटनेच्या वतीने डॉ. माधव हिवाळे यांनी केली आहे.