ईएमआय (हप्ते) असणार्यांना महाराष्ट्र सायबरचे सावध आवाहन
वाशीम - कोरोना महामारीच्या काळात सामान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरायला, अडचण होऊ नये याकरिता सदर हफ्ते 3 महिन्यांसाठी स्थगित करण्याचे आवाहन भारतीय रिजर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना केले होते. काही सायबर गुन्हेगार सदर आवाहनाचा गैरफायदा घेऊन सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. सामान्य लोकांना एक मॅसेज (एसएमएस) पाठवून सर्व बँक खात्याचे डिटेल्स म्हणजेच खाते क्रमांक, डेबिट/क्रेडिट कार्डसचा तपशील व पिन नंबर इत्यादी एका विशिष्ट मोबाइल क्रमांकावर पाठवायला सांगत आहेत. खातेदारकांनी सदर माहिती पाठविल्यावर थोड्या वेळात एक मॅसेज (एसएमएस) येतो व तो माहिती करून घेण्यासाठी एक कॉल येतो व समोरची व्यक्ती असे भासविते कि, सदर व्यक्ती त्या बँकेतील स्टाफच आहेत व तो मॅसेज (एसएमएस) घेतात. थोड्यावेळाने खातेदारकाला बँकेचा मॅसेज (एसएमएस) येतो कि त्याच्या खात्यातून काही रक्कम डेबिट होऊन दुसर्या कोणत्यातरी अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाली आहे.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना असे विनम्रपणे आवाहन करते कि जर असा काही माहिती मागणारा मॅसेज (एसएमएस) आला तर आपण आपली माहिती पाठवूं नये. कारण तुमचे कर्ज असणार्या बँकेकडे तुमचा सर्व तपशील आधीपासून उपलब्ध असतोच व असा मॅसेज (एसएमएस) आल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करून खातरजमा करावी .तसेच आपण जर चुकून असे फसविले गेले असाल तर आपल्या बँकेच्या हेल्पलाईन वर माहिती द्यावी व पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करावी. तसेच या गुन्ह्याची नोंद www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) करावी.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ