कामगार, कर्मचार्यांना बंद काळातील संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आदेश
वाशिम, दि. ०३ (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायातील तसेच अन्य दुकाने व इतर आस्थापना बंद आहेत. या आस्थापनांच्या कर्मचारी, कामगारांना बंद काळातील संपूर्ण वेतन व भत्ते देण्याचे आदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिले आहेत.
सर्व खासगी आस्थापना, कारखाने, कंपन्या, दुकाने (अत्यावश्यक सेवा आस्थापना वगळून) इत्यादी आस्थापनांचे जे कंत्राटी, बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यात आलेले कर्मचारी व कामगार, तात्पुरत्या कालावधीसाठीचे कर्मचारी व कामगार, रोजंदारीवरील कामगार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे घरी अथवा स्थानबद्ध आहेत, अशा सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना ते कर्तव्यावर होते, असे समजून त्यांना बंद काळातील संपूर्ण वेतन व भत्ते देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या राज्य कार्यकारणीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव यांनी ३१ मार्च २०२० दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्यिक, व्यापारी व दुकाने आस्थापांना हे आदेश लागू राहतील. त्यांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौ. र. नालींदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
