पत्रकारांसाठीची अधिस्विकृती सवलत ३१ मे पर्यत वैध
वाशीम - महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलपर्यत असणार्या संचारबंदीत अजून एक दिवसाने वाढ करण्यात आली असून आज १ एप्रिलपासून १५ एप्रिलपर्यत म्हणजे तब्बल १५ दिवस नागरीकांना संयम पाळून लॉकडाऊनचे पालन करावे लागणार आहे. २५ मार्चपासून २२ दिवसाच्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, कॉलेजच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या असून सीबीएसई बोर्डाच्या परिक्षाही रद्द करण्याबाबत सरकार विचार करत आहे. यासोबतच विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी अत्यावश्यक कामे एकतर पुढे ढकलण्यात आली आहेत किंवा स्थगीत करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या या कालावधीमध्ये सर्व शासकीय कामे बाजुला सारुन शासनाने नागरीकांना सर्वोत्तम आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रीत केले असून राज्यातील नागरीकांना कोरोनाचा चा संसर्ग होवू नये म्हणून शासकीय यंत्रणा युध्दस्तरावर कामाला लागली आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत ३१ मार्च नंतर होणार्या राज्यातील पत्रकारांच्या अधिस्विकृती सवलतीच्या नुतनीकरणाचे कामही लांबणीवर टाकण्यात आले आहे. ३१ मार्चनंतर अधिस्विकृती पत्रिकांचे नुतनीकरण होणार नसल्याने पत्रकारांना याचा कोणताही त्रास होवू नये यासाठी शासनाने या सर्व अधिस्विकृती पत्रिकांची वैधता ३१ मे पर्यत वाढविली आहे. याबाबत ३१ मार्च रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबईचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ३१ मार्च रोजी काढलेल्या विशेष परिपत्रकाव्दारे याबाबतच्या सुचना सर्व संबंधीत घटकांना दिल्या आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
