Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना संकटात कारंजा न.प. चा मदतीचा हात : 511 दिव्यांगांच्या खात्यात प्रत्येकी 1150 रुपये जमा


कोरोना संकटात कारंजा न.प. चा मदतीचा हात : 511 दिव्यांगांच्या खात्यात प्रत्येकी 1150 रुपये जमा
कारंजा (लाड) - कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. या काळात दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्येंना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर कारंजा नगर पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.  दिव्यांगाना येणार्‍या संभाव्य अडचणी लक्षात घेता शहरातील 511 दिव्यांगाच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1150 रुपये प्रमाणे एकूण 5 लाख 87 हजार 650 रुपये वर्ग केल्याची माहिती मुख्यधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली आहे.
      अपंग कल्याण पुनर्वसन योजनेअंतर्गत दिव्यांगांना दरवर्षी कारंजा नगर पालीकेच्या उत्पन्नातून 5 टक्के अपंग कल्याण निधी म्हणून दिल्या जाते. हा निधी अपंगांना धनादेश किंवा वस्तूंच्या स्वरूपात देण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनामुळे रक्कम आरटीजीएस स्वरूपात तत्काळ देण्याचे ठरवले व या नुसार रक्कम अपंगांच्या खात्यात जमा केली करण्यात आली आहे. शहरातील चाळीस टक्केच्या वर अपंगाचे प्रमाणपत्र असणार्‍यांची नोंद करण्यात आली असून अशा 511 जणांना प्रत्येकी 1150 रुपये प्रमाणे एकूण 5 लाख 87 हजार 650 रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कोरोना व्हायरसबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना न. प. हद्दीतील दिव्यांगांना जीवन जगताना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहे. दरवर्षी दिव्यांगांना प्रशासना तर्फे दिवाळी दरम्यान आर्थिक मदत केली जाते मात्र यावर्षी कोरोनामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच दिव्यांगाना आर्थिक मदत करण्याचा  निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.