राजाभैय्या पवार मित्रमंडळाची सामाजीक बांधीलकी
शहरातील विविध भागात 200 किलो खिचडीचे वितरण
वाशिम - सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले समाजसेवक राजाभैय्या पवार आणि मित्र मंडळच्या वतीने विविध टप्यात आतापर्यंत 200 किलो खिचडी चे वितरण शहरातील विविध भागात करण्यात आले.
संपूर्ण विश्व आज कोरोनाच्या समस्येने त्रस्त झाले आहे आणि सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लोकं आहेत त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. वाशिम शहरात सुद्धा शेलु रोड व जागमाथा येथे झासी उत्तर प्रदेश चे चटई, प्लास्टिक च्या कचरपेटी व अंगठ्या विकणारे तर यवतमाळ येथील आयुर्वेदिक जडीबुटी विकणारे अनेक गोरगरीब कुटुंब लॉकडाऊन नंतर इथेच अडकलेले आहे, अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता तर हिंगोली रोड स्थित वाल्मिकनगर मधील शासकीय घरकुलातील गोरगरीब कुटुंबियांची सुध्दा उपासमार होत होती. ही बाब लक्षात ठेवून समाजसेवक राजाभैय्या पवार यांनी पुढाकार घेत या गरीब कुटुंबांना 10 एप्रिल ला 30 किलो, 12 एप्रिल ला 55 किलो, 17 एप्रिल ला 45 किलो आणि 18 एप्रिलला 70 किलो असे आतापर्यंत एकूण 200 किलो स्वादिष्ट खिचडीचे वितरण केले. या वितरणासाठी समाजसेवक राजाभैय्या पवार, सामाजिक कार्यकर्ते सुशील भिमजियाणी, श्याम सांबरे, विशाल बबेरवाल, वीरेंद्र बबेरवाल, विनोद झाझोट, विक्रम बबेरवाल, साहिल जानीवाले, देवेश पवार, प्रा.कांतीलाल पाटील, शिवा कांबळे, शैलेश खडसे, शंकर तुपसुंदर, तुषार खडसे, शिवाजी कांबळे, दीपक साठे, विजय बोयत, विशाल कलोसे, देवा पवार, कुणाल कलोसे, गोलू बबेरवाल, प्रथम पिवाल, शुभम पवार आदींनी अथक परिश्रम घेतले. या खिचडी वितरणामध्ये वाल्मिकीनगर येथील जहारवीर गोगाजी समिती आणि जय लहुजी मित्र मंडळ माहुरवेशच्या सदस्यांनी सहकार्य केले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ