Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचं कर्तृत्व आणि दातृत्व : सीएम फंड कोविड-19 मध्ये 197 कोटी जमा


महाराष्ट्राचं कर्तृत्व आणि दातृत्व : सीएम फंड कोविड-19 मध्ये 197 कोटी जमा
मुंबई - महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना विषाणूच्या महासंकटाच्या गंभीर प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या एका आवाजासरशी  संपुर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरु झाला. आजघडीला मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र खात्यात तब्बल 197 कोटी रुपये जमा झाले आहेत. पराक्रमात आणि दानशुरपणात देशात सर्वात पुढे असलेल्या महाराष्ट्राच्या कर्तृत्व आणि दातृत्वाबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे या सहायता निधीमध्ये मोठमोठ्या उद्योगपतींपासून, दानशुर व्यक्ती व संस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांसह चिमुकल्यांनीही आपली पिगी बँक फोडून या कठीण प्रसंगी महाराष्ट्राला आर्थिक मदतीचा हात दिला आहे. या निधीत 83 वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी 25 लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत 170 कोटी रुपये जमा झाले आहेत. गत दोन दिवसांत ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. याशिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावणे सुरू केले आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत 197 कोटी रुपये जमा झाले आहेत. निधीचा उपयोग कोरोनापिडीतांच्या उपचारासाठी खर्च होणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात येणार्‍या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
खात्याची इंग्रजीत माहीती -
Chief Minister's Relief Fund-COVID 19
Savings Bank ccount number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
खात्याची मराठीत माहीती -
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड - एसबीआयएन0000300