शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रस्तावासाठी शेवटचे चार दिवस संधी
शौचालयासाठी पात्र नावे ऑनलाईन करण्याची लिंक केवळ 4 दिवस सुरू
ग्रामसेवकांमार्फत पं. स. ला प्रस्ताव सादर : दीपक कुमार मीना
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांचा केंद्राकडे यशस्वी पाठपुरावा
वाशिम - शौचालय नसलेल्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन करण्याची लिंक जी 31 जानेवारी 2020 रोजी बंद करण्यात आली होती ती आता केंद्र शासनाने पुन्हा सुरू केली आहे. ज्यांच्याकडे अजूनही शौचालयाची सुविधा नाही अशा लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आणि कुटुंब प्रमुख असल्याचा दाखला का मार्फतच पंचायत समितीला सादर करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने हागणदारी मुक्त घोषित करण्यात आले होते. मात्र एक कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली होती. याबाबत गाव पातळीवर दोन वेळा नव्याने सर्वे करण्यात आले होते. सर्वे मधूनही काही कुटुंब सुटले असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. जिल्ह्यात एकही कुटुंब शौचालयाविना राहू नये म्हणून ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. शासन स्तरावर त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला या निमित्ताने यश लाभले आहे.
लवकरच महाराष्ट्रात जनगणनेला सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्व सर्व कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा असणे अपेक्षित आहे. गावातील शौचालय नसलेल्या पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आपले प्रस्ताव ग्रामपंचायतीला सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी निर्मल भारत अभियान व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यापूर्वी रु. 12000 आणि रु. 4600 चा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
पात्र लाभार्थ्यांनी केवळ ग्रामसेवकामार्फतच पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे प्रशासनाचे आवाहन!
सध्या सर्वत्र कोरोना या विषाणूची साथ असल्यामुळे नागरिकांनी कार्यालयात येऊन गर्दी करू नये. पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचार्यांनी सुद्धा नागरिकांमार्फत प्रस्ताव न स्विकारण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. नागरिकांनी आपले आधार कार्ड व शौचालयाचा प्रस्ताव ग्रामसेवकामार्फतच पंचायत समितीला सादर करावे. याबाबत नागरिकांची काही तक्रार असल्यास प्रत्यक्ष न भेटता न जिल्हा परिषदेच्या ceozpwashim@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिंधीनी या बाबींकडे प्राधान्याने लक्ष घालुन आपल्या सर्कल मधील पात्र लाभार्थींची नावे ग्रामसेवकांमार्फत समाविष्ट करावी.
-चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष जि.प. वाशिम