अॅसिडहल्ला पिडीत कु. अर्चना शिंदेला शासकीय नोकरीत सामावून घ्या
समाजसेवी डॉ. मंजुश्री जांभरुणकर व सौ. अश्विनी इंगळे यांच्या पुढाकारात निवेदन
वाशिम - अॅसिडहल्ला पिडीता कु. अर्चना शिंदें हिला शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेवून तिचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी येथील समाजसेवी व मैत्रेय महिला संस्थेच्या सचिव डॉ. मंजुश्री जांभरुणकर व सामाजीक कार्यकर्त्या सौ. अश्विनी विनोद इंगळे यांच्या पुढाकारात खासदार भावनाताई गवळी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, वर्ष 2003 मध्ये शहरात एकतर्फी प्रेमातून कु अर्चना शिंदे या तरुणीवर अॅसिड हल्ला करून तिला आयुष्यातुन उठविण्याचा प्रयत्न झाला. त्यातून ती कशीबशी वाचली आणि आज ती विकृत स्वरुपात हिंमतीने आयुष जगत आहे. व रोजच समाजात वावरत असतांना जगण्यासाठी धडपडत आहे. अॅसिडहल्ला पिडीतांच्या वेदनांवर आधारीत छपाक चित्रपटामुळे तिचे मनोबळ आज वाढले आहे. ती अॅसिड पिडीत असून अत्यंत कठीण परिस्थितीतून तिने आपले शिक्षण चालूच ठेवले होते व आजरोजी तिने बी.ए. करून टायपिंग तसेच एमएससीआयटी पूर्ण केलेले आहे. आज ती गेल्या 16 वर्षापासून मानसिक यातना सहन करीत आहे. चेहर्यावर अॅसिड हल्ला झाल्यामुळे तिचे ते भयानक रूप पाहून तिला कुठेही मोकळेपणाने फिरता येत नाही. तसेच खाजगी नोकरीही कोणी देत नाही. खाजगी आयुष्य उध्वस्त झालेल्या मुलीचा विचार करून तिच्या उदरनिर्वाह आणि वृद्ध आईवडीलांच्या संगोपनाची जबाबदारी या बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन तिला मनोधैर्य योजनेचा लाभ द्यावा तसेच तिला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत सामावून घेण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ