मालेगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्र आठवड्यातून तीन दिवस राहणर सुरु
सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कालावधी निश्चित
वाशिम, 30 मार्च - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत स्थानिक पातळीवर शेतकर्यांकडून बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी होण्याची शक्यता लक्षात घेवून मालेगाव तालुक्यातील सर्व कृषि सेवा केंद्र प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश तहसीलदार रवि काळे यांनी दिले आहेत.
बियाणे, खते यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मध्ये असल्याने या वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आठवड्यातील तीन दिवस विहित कालावधीत कृषि सेवा केंद्र सुरु असताना शेतकर्यांना उभा राहण्यासाठी दोन मीटर अंतरावर एक याप्रमाणे निशाणी आखावी. दुकानात गर्दी होवू नये, याची दक्षता घ्यावी.
तसेच शेतकर्यांना हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था व हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर ठेवावेत. कोणत्याही परिस्थितीत आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. संचारबंदीमध्ये राज्यातून किंवा परराज्यातून येणार्या बियाणे, खते व कीटकनाशके यांची आयात सुरु राहील, असे आदेश तहसीलदार श्री. काळे यांनी दिले आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
