Ticker

6/recent/ticker-posts

यशासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही - डॉ. अभय पाटील


यशासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही - डॉ. अभय पाटील 


सोमठाणा जि.प.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात


वाशिम :14 फेब्रु.- आजच्या प्रगत विज्ञात युगात सोशल मीडियाचा वापर वाढल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे़ आयुष्यात यशोशिखर गाठण्यासाठी ज्ञान मिळवून कठोर परिश्रमाला पर्याय नसल्याचे मत डॉ़  अभय पाटील यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत 12 फेब्रुवारी रोजी आयोजीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. 
 या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, सभापती चक्रधर गोटे, सभापती विजय खानझोडे, पंचायत समिती सदस्य गजानन व्यवहारे, गजानन आरु, शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ वानखेडे, नागेश कव्हर, प्रशांत वाझुळकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सरोदे, पवन नप्ते, आदर्श शिक्षक दादाराव शिंदे, डॉ. सुभाष ठोकळ, शिवशंकर कव्हर, अतुल अमानकर, मंचकराव तायडे, दत्तराव खाडे, भूषण खाडे, ज्ञानबा आरु,आकाश शिंदे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊसाहेब व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पुजन करुन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, घरात टिव्हीवर सासुसुनाच्या मालिका पाहिल्यापेक्षा आजच्या पिढीने वाचनावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. घराघरात वाचनालय तयार होवून आजच्या पिढीने महापुरुषांचे गुण अंगिकारण्याची खर्‍या अर्थाने गरज असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना उपक्रमाची व आयोजकांची प्रशंसा केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विलास नायक यांनी तर बहारदारपणे सुत्रसंचालन आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर गवळी यांनी तर शिक्षक संतोष शितलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, तरूण उत्साही मंडळी व गावकर्‍यांनी परिश्रम घेतले.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.