देशात राजकीय अस्थिरता व अशांतता राहील
आचार्य विजयप्रकाशजी दायमा यांचे भाकीत
प्रतिनिधी । १० जानेवारी वाशीम - यंदाची मकरसंक्रांत ही गदर्भावर स्वार असून पांढरी साडी परिधान केलेली आहे. ती पुर्वेकडून पश्चिमेकडे | जात आहे. त्यामुळे पांढऱ्या वस्तु महाग होतील व देशात राजकीय अस्थिरता आणि अशांततेचे वातावरण राहील असे फळ या वर्षीच्या मकरसंक्रातीचे असल्याचे भाकीत प्रसिध्द भागवताचार्य व ज्योतीषाचार्य आचार्य विजयप्रकाशजी दायमा यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, यावर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी आहे. | मकरसंक्रांतीचे वाहन गदर्भ असून उपवाहन मेष आहे. हा काळ सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत | राहील. हिंदुधर्मामध्ये मकरसंक्रांतीचे फार महत्व आहे. मकर राशामध्य सुय प्रवशासाबत हा सण साजरा केला जातो. मेष, वृषभ, सिंह, धनु, मिन या राशी धारण करणाऱ्या व्यक्तींना मकरसंक्रांतीचे फळ शुभ अवसून मिथुन, कर्क, वृश्चिक, कन्या, कुंभ राशीच्या व्यक्तींना साधारण लाभदायक राहील. तर तुला, मकर राशीच्या व्यक्तींच्या ही मकरसंक्रांत कष्टप्रद राहील. तुला व मकर राशीच्या व्यक्तींनी या संक्रांतीच्या अनिष्ट फळापासुन वाचण्यासाठी गायींना चारा, गुड, ढेप, चनादाळ व हिरव्या भाज्या खाऊ घालाव्यात. यासोबतच गोरगरीबांना उबदार वस्त्राचे दान करावे. तिळाच्या तेलाचे दिवे लावावे. तसेच सूर्यपुजन, सुर्य उपासना, सुर्य मंत्राचा जप केल्याने | मकरसंक्रांतीच्या प्रभावाने निर्माण झालेल्या सर्व | कष्टाचे निवारण होवू शकेल असे मत आचार्य | विजयप्रकाशजी दायमा यांनी सर्व राशींच्या | व्यक्तींसाठी या मकरसंक्रांतीच्या फलादेशाचा गोषवारा मांडतांना व्यक्त केले.